अहमदनगर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न


वेब टीम : अहमदनगर
चौदा वर्षीय अल्पवयीन मुलास सुरीचा धाक दाखवुन 35 ते 40 वर्षीय अनोळखी इसमाने अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करून मारहाण करून चावा घेतला.

ही घटना रेल्वे स्टेशन परिसर ते केडगाव देवी रोड दरम्यान शुक्रवारी (दि.7) रात्री 7.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान घडली.

रेल्वे स्टेशन परिसरात समोसे विक्री करणार्‍या 14 वर्षीय मुलास एका अनोळखी इसमाने 100 समोसे पाहिजे असे सांगुन त्याला केडगावदेवी रोडला नेले. आणि पडक्या कारखान्याच्या पडक्या खोलीत नेले.

मुलास सुरीचा धाक दाखवुन त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलाने प्रसंगावधनाने रस्त्यावरील दगड इसमाच्या तोंडावर मारला. त्यामुळे त्या इसमाने मुलाच्या पोटाला, छातीला, तोंडाला चावा घेतला व पळुन गेला.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 377, 511, 325 बालकाचे लैगिंक अत्याचारपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 18 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post