तुम्हाला घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप आलाय; हा असू शकतो 'कोरोना' व्हायरस


वेब टीम : दिल्ली
जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतातही आढळून येत आहे. यात प्रामुख्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप असणे हे त्याची प्राथमिक लक्षणे मानली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत.

दिवसभर डोकं जड होणे, सतत डोकेदुखी होणे.

सतत बरेच दिवस वाहणारे नाक आणि औषधोपचारानंतर पण नियंत्रित होत नसणे.

जास्त खोकला हे कोरोना व्हायरस संक्रमणाचे लक्षण असू शकते.

या संसर्गामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा घसा नेहमी खवखवतो.

कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ताप येणे हे या संसर्गाचे प्रारंभिक लक्षण आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शरीरात अस्वस्थता जाणवते. त्याला काय होता आहे हे स्वतःला कळत नाही. आजारी असल्याचे आढळून येते.

कोरोना विषाणूचा श्वसन प्रणालीवर परिणाम होतो ज्यामुळे शिंका येणे हे या त्रासाची लक्षणे आहे.

दम्याच्या रूग्णांना या संसर्गामुळे श्वास घेण्यास सर्वात जास्त त्रास होतो.

दिवसभर थकवा जाणवणे आणि शरीरात सतत थकवा येणे हे कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे लक्षण आहे.

कोरोना व्हायरसचे संसर्ग बर्‍याच देशात वेगाने पसरत आहे आणि ज्यांना ह्या विषाणूंची लागवण झाली आहे ते मरण पावत आहे.

सध्या तरी या विषाणूंसाठी कोणतेही औषध किंवा लस नसल्याने हे अत्यंत धोकादायक मानले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post