क्रूरकर्मा दहशतवादी हाफिज सईदला पाच वर्षांची शिक्षा


वेब टीम : इस्लामाबाद
दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजला दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हाफिजच्या विरोधात दहशतवाद्यांना आर्थिक मदत, मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीपणे ताबा मिळवणे आदी प्रकरणात २९ गुन्हे दाखल आहेत.

मागील वर्षी लाहोरमधील दहशतवादविरोधी कोर्टाने बंदी असलेल्या जमात-उद-दवा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईदविरोधातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये निकाल राखून ठेवला होता.

हे खटले दहशतवादविरोधी पथकाच्या लाहोर आणि गुजरावाला शाखेच्यावतीने दाखल करण्यात आले होते.

मागील वर्षी जुलै महिन्यात हाफिजला अटक करण्यात आली होती. त्याआधी जमात-उद-दवाच्या प्रमुख नेत्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हाफिजने एक स्वयंसेवी संस्थापन केली होती. त्याद्वारे आर्थिक मदत जमा करून हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post