जागतिक कर्करोग दिन : ‘अशा’ प्रकारे ओळखता येईल गर्भाशयाचा कर्करोग


वेब टीम : मुंबई
स्रीयांमध्ये आढळून येणारा गर्भाशयाचा कर्करोग हा हळूहळू वाढत जाणारा कर्करोग आहे. यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

शिवाय, यातून बचावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण, यातील अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच पुढच्या टप्प्यात होते.
गर्भाशयाचा कर्करोग योग्य वेळेत ओळखून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी खालील उपाय करणे आवश्यक आहे.

लैंगिक संबंधादरम्यान वेदना होणे, ओटीपोटात दुखणे, मासिक पाळीदरम्यान अतिजास्त रक्तस्राव होणे, विनाकारण वजन खूप कमी होणे अशा लक्षणांकडे स्त्रयांनी लक्ष द्यायला पाहिजे.

या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लहान वयातच (१२ आणि १३ वर्षे) मुलींना लस देणे हा एक चांगला पर्याय आहे. लसीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळतेच असे नाही. मात्र त्याचा धोका निश्चितच कमी होतो, मात्र संपत नाही.

६५पेक्षा जास्त वय असेल आणि नियमितपणे तपासणी करत असाल अशा वेळी काही लक्षणे आढळून न आल्यास तुम्हाला चाचणी करायची गरज राहत नाही.

२० ते ५० वर्षे वयोगटातील स्त्रयांनी दर दोन ते तीन वर्षांतून एकदा गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करणे आवश्यक आहे. २० वर्षांखालील स्त्रयांना हा कर्करोग झाल्याची काही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. लैंगिकदृष्टय़ा सक्रिय झाल्यानंतर या चाचण्या नियमितपणे करणे आवश्यकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post