महिलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय


वेब टीम : मुंबई
गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरुन गेलाय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबतच्या खटल्यांसाठी राज्यात 138 जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे.

गृहमंत्रालय आणि राज्य सरकारचं यावर एकमत झालं असून लवकरच यावर काम सुरू करणार आहे. या 138 कोर्टांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे जवळपास 29 हजार प्रलंबित खटले चालणार आहेत.

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे जवळपास 29 हजार खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

वाढत्या महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे. पीडितांना तत्काळ न्याय देण्यासाठी जलदगती न्यायालयांची मागणीही अनेक दिवसांपासून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post