नवीन वाहन घेताय; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय


वेब टीम : दिल्ली
वाढत्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी आगामी काळात विक्री होणार्‍या नवीन वाहनांमध्ये ’मायक्रो डॉट’ यंत्रणा बसविली जाणार आहे.

’मायक्रो डॉट’ बसविण्याचे काम वाहन उत्पादित करणार्‍या कंपनीकडून केले जाणार आहे.

या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या चोरीवर ब्रेक लागणार असून,  भंगार सामान वापरण्यावरही बर्‍याच प्रमाणात नियंत्रण येणार आहे.

वाहनांची विक्री वाढत असताना, शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. या वाढलेल्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाने जुलै 2019 मध्ये केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत ’मायक्रो डॉट’ बसविण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आगामी काळात वाहन उत्पादन करणार्‍या कंपनीला नवीन उत्पादित वाहनांमधील सुट्या भागांवर ’मायक्रो डॉट’ लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दुचाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये ही व्यवस्था लावण्याबाबत केंद्र शासनाकडून अध्यादेश काढण्यात आलेले आहेत.

या आदेशाप्रमाणे नवीन उत्पादित वाहनांवर ’मायक्रो डॉट’ लावण्यात येणार आहे. या ’मायक्रो डॉट’ च्या माहितीवरून सदर डॉट ज्या वाहनांचे आहे. त्याची माहिती या ’डॉट’ वरून मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे दुचाकीच्या दोन हजार सुट्या भागांवर हे ’मायक्रो डॉट’ लावण्यात येणार असून, चार चाकी वाहनाच्या पाच हजार सुट्या भागांवर ’डॉट’ लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात चार चाकी आणि दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटचाही यात समावेश असणार आहे.

मायक्रो डॉट हे वाहनांच्या सुट्या भागावर लावले जाणार आहेत. दुचाकी वाहनामध्ये 0.5 मिलीमिटर आणि चार चाकी वाहनामध्ये 0.8 मिलीमिटर आकाराचे हे ’डॉट’ असतील.

या ’डॉट’ मध्ये ’युनिक आयडी नंबर’ सह वेबसाइटची माहिती असेल. या ’युनिक आयडी नंबर’ वरून किंवा माहितीवरून हे पार्टस कोणत्या ’चेसीस’ क्रमांकाच्या वाहनांमध्ये हे ’डॉट’ बसविण्यात आले होते.

याची माहिती मिळणार आहे. हे ’डॉट’ उघड्या डोळ्याने ओळखणे अवघड असले तरी अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणामध्ये ते पाहता येणार आहेत.

केंद्र शासनाने केलेल्या निर्देशानुसार ’मायक्रो डॉट’ लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहनांची चोरी आणि वाहनांमध्ये स्क्रॅप यंत्र लावण्यावर निर्बंध येणार आहे. यामुळे वाहने सुरक्षित राहणार आहेत.

अर्थात ही ’मायक्रो डॉट’ यंत्रणा यापुढील काळात उत्पादित होणार्‍या वाहनांमध्ये बसविली जाणार आहे. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नंतर ’मायक्रो डॉट’ यंत्रणे मुळेही वाहन चोरीला आळा बसू शकतो असा सरकारचा कयास आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post