इंदोरीकर महाराज आले अडचणीत; कीर्तनात सांगितला मुलं होण्याचा उपाय


वेब टीम : अहमदनगर
सुप्रसिध्द कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांना वादग्रस्त वक्तव्यावरून नोटिस बजाविण्यात आली आहे.

हा निर्णय जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटीए (प्रि-कन्सेप्शन अॅण्ड प्रि-नॅटल डायग्नोस्टिक टेकनिक्स अॅक्ट) समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सम तिथीस स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीस मुलगी होते, असे वक्तव्य त्यांनी ओझर येथील एका कीर्तनाच्या कार्यक्रमात केले होते. गर्भलिंग निदानाअंतर्गत हे वक्तव्य येत असल्याने, पीसीपीएनडीटीएच्या समितीने ही नोटिस बजाविली आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांविरुद्ध पुरावे आढळल्यास, गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पीसीपीएनडीटीएने म्हटले आहे.

इंदोरीकर महाराज हे अतिशय लोकप्रिय असून, त्यांची कीर्तने सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात, हे येथे उल्लेखनीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post