लॉकडाऊन : चिंता नको, आयटीआर, जीएसटी भरण्यासाठी आता ३० जूनपर्यंत मुदत


वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर परतावा, जीएसटी भरणा, आधार-पॅन लिंक करण्याची मुदत तसेच ’विवाद से विश्वास’ योजनेची मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी (दि.24) दुपारी मोठी घोषणा केली आहे.

चीनमधल्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वार्‍यासारखा पसरतो आहे.

त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.

लोकांना दिलासा देण्यावर काम सुरू असून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे.

प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत वाढवून 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे.

उशिरा कर परतावा भरणार्‍यांकडून 12 ऐवजी 9 टक्के दंड आकारला जाणार आहे.

कर परताव्यास उशीर झाल्यास दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे.

2018-19 या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्यात आली असून, आता 30 जून 2020 पर्यंत टॅक्स रिटर्न भरता येणार आहे.

तसेच आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मार्च, एप्रिल, मेचा जीएसटी भरणा 30 जूनपर्यंत करता येणार आहे. ’विवाद से विश्वास’ योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post