जेष्ठ चित्रपट अभिनेत्री निम्मी काळाच्या पडद्याआड


वेब टीम : मुंबई
जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री निम्मी नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेल्या.

त्या ८८ वर्षांच्या होत्या. बरसात, बसंत बहार, दीदार, मेरे मेहबूब यांसह विविध चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या.

नबाब बानू हे त्यांचे खरे नाव. राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित ‘बरसात’ या चित्रपटातून त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत आगमन झाले.

राज कपूर यांनी त्यांचे निम्मी असे नामकरण केले. त्यांच्या आई वहिदनबाई या गायिका आणि अभिनेत्री होत्या.

दिलीपकुमार, देव आनंद, अशोककुमार, प्रेमनाथ अशा बऱ्याच अभिनेत्यांबरोबर निम्मी यांनी काम केले.

विख्यात संवाद लेखक अली रझा हे त्यांचे पती.

चित्रपट सृष्टीकडे पाठ फिरवल्यावर सार्वजनिक कार्यक्रमात निम्मी यांचे क्वचित उपस्थिती होती.

आन, अमर या मेहबूब खान दिग्दर्शित चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post