चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग विरोधात लाट; सत्तापालटाची शक्यता


वेब टीम : बिजिंग
जागतिक लोकसंख्येच्या एकूण एक तृतीयांश लोक म्हणजेच 260 कोटी लोक सध्या लॉकडाऊनमध्ये असून त्यामागील कारण म्हणजे कोरोनाव्हायरस ही महामारी जी चीनच्या वुहानमधून सुरु झाली.

हा व्हायरस हाताळताना चीनने कमालीचे दुर्लक्ष केले असल्याचे अनेक विश्लेषक आणि संशोधकांचे मत आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या व्हायरसला हाताळण्याबाबत पाहिजे तसा प्रतिसाद दिला नसल्याबद्दल नुकतीच चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या एका गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

चीनमधील लोकप्रिय प्लॅटफार्म असलेल्या “वी चॅट” या ब्लॉग ने एक मॅसेज जारी केला असून यात त्यांच्याविरुद्ध बंड होण्याची शक्यता वर्तविली आहे.

जिनपिंग यांच्या कामगिरीबाबत मूल्यांकन करण्यासाठी पोलित ब्युरोची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी एका खुल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

25 सदस्सीय पॉलिट ब्युरो हा कम्युनिस्ट पार्टी चालवितो.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध या गटाचे म्हणणे आहे की शी ने चूक केली आहे.

त्यांनी यापुढेही चीनचे नेतृत्व करावे काय याबाबत फेरविचार करावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post