अहमदनगर : तरुणाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून टाकून दिला


वेब टीम : अहमदनगर
नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथील टोलनाक्याजवळ एका अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून टाकून दिल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली.

टोलनाका परिसरात मोकळ्या जागेत मृतदेह टाकल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

याबाबतची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि. मोहन बोरसे हे पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

दरम्यान या मयत तरुणाची ओळख दुपारी उशिरापर्यंत पटलेली नव्हती.

अज्ञात व्यक्तींनी त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला व मृतदेह पोत्यात बांधून टोलनाका परिसरात मोकळ्या जागेत आणून टाकला असल्याची शक्यता आहे.

मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post