अहमदनगर : सावधान... ! शहरात आढळला कोरोना ची लागण झालेला अजून एक रुग्ण


वेब टीम : अहमदनगर 
नगर जिल्ह्यामध्ये आज मंगळवारी (दि.२४) कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नव्याने आढळलेला हा कोरोना रुग्ण नगर शहरातील असून तो कुठेही परदेशात फिरायला गेला नव्हता.

केवळ संसर्गातून त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

सदरचा रुग्णाला सर्दी, खोकला येत असल्याने तो स्वत:हून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.

यावेळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.

नगर शहरात आणि जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण या पूर्वी आढळलेले होते.

त्यात आज तिसऱ्याची भर पडली आहे. कोरोना हा संसर्गातून फैलावत असल्याने प्रशासनाने जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. नगरकर मात्र या आदेशाचे उल्लंघन करत आहेत.

त्यातूनच आता हा तिसरा पॉझिटिव्ह नगरमध्ये आढळला आहे. पुणे येथील एनआयव्हीने दिलेल्या अहवालात तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी (दि.२४) पुण्याच्या प्रयोगशाळेतून १३ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी १ पॉझिटिव्ह तर १२ निगेटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील असून तो कुठेही बाहेरदेशात गेलेला नव्हता.

त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात आला, याचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरु केला आहे.

नगरमधील कोरोना बाधितांची संख्या आता ३ झाली असल्याने नगरकरांनी आता स्वतःच काळजी घेण्याची गरज आहे.

नगरमध्ये आणखी एक ‘करोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. करोनाग्रस्त भागात प्रवास न केलेल्या व्यक्तीला बाधा झाल्याचे आढळून आल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

नगरमध्ये यापूर्वी दोन करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातील पहिल्या रुग्णाची एक चाचणी निगेटीव्ह आलेली होती. बदलत्या निकषानंतर आणखी एक चाचणी होणार आहे. त्याचा अहवाल यायचा आहे.

आता नगरमध्ये करोनाबाधितांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. सध्या नगरमध्ये २७७ जण होम क्वारंटाइन आहेत. तर १० जण जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली आहेत.

९ जणांचे तपासणीचे अहवाल येणे मात्र बाकी होते. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज आढळून आलेला बाधित रुग्ण स्थानिक आहे. इतरांप्रमाणे तो करोनाबाधित भागात प्रवास करून आलेला नाही.

स्थानिक संसर्गातून त्याला बाधा झाल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मात्र, त्याच्यासह आधीच्या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post