कोरोना इफेक्ट: क्रिकेटपटूंचा घरच्या घरी व्यायाम

file photo

वेब टीम : मुंबई
सध्या भारत २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. भारतीय खेळाडू आपल्या घरीच आहेत.

आपल्या कुटुंबियाबरोबर ते मस्त मजेदार वेळ आनंदात घालवत आहेत.

पण तरीही त्यांनी व्यायाम सोडलेला नाही.

तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी काही गोष्टी करायला हव्यात, असे संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना सांगितल्याचे समजते.

तसेच भारतीय संघ व्यवस्थापन ऑनलाईन वरून क्रिकेटपटूंना व्यायाम करण्यास सांगत आहे. तसेच महत्वाच्या सूचनाही देत आहे.

फिजिओ नितीन पटेल आणि कंडिशनिंग कोच निक वेब यांनी मात्र खेळाडूंना काही गोष्टी तंदुरुस्तीसाठी करण्यास सांगत आहे.

जो खेळाडू भारतासाठी कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळतो, त्या खेळाडूला या गोष्टी करणे अनिर्वाय आहे.

प्रत्येक खेळाडूला वेगवेगळा व्यायाम सांगितला आहे.

गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, यष्टीरक्षक या सर्वांना वेगवेगळे व्यायाम प्रकार दिले आहेत आणि त्यानुसार ते व्यायाम करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post