धक्कादायक : ब्रिटनच्या राजघराण्यात कोरोनाचा प्रवेश; विलीनीकरण कक्षात दाखल


वेब टीम : लंडन
जगभरात वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या संसर्गाने ब्रिटनच्या राजघराण्यातही शिरकाव केला आहे.

प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून राजघराण्यात मोठी खळबळ उडाली.

प्रिन्स चार्ल्स आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये विलगीकरण कक्षात आहेत.

प्रिन्स चार्ल्स यांची काही दिवसांपूर्वी मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट यांनी भेट घेतली होती.

त्यांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे.

क्लेरेंस हाऊसचे प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रिन्स ऑफ वेल्स यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले.

त्यांच्यात कोरोनाची थोडी लक्षणे आढळली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे.

ते काही दिवसांपासून घरातूनच काम करत आहेत.

शासकीय आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रिन्स चार्ल्स यांना स्कॉटलंडच्या बालमोरल राजवाड्यात आयसोलेशनमध्ये आहेत.

प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला यांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यांना बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

राणी एलिझाबेथ यांना याआधीच बर्मिंघम पॅलेसहून विंडसर येथील राजवाड्यात नेले आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाची बाधा झाल्यामुळे ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ हजारहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post