फेसबुक, व्हाट्सऍपचे दिवस भरले; आता टिक टॉकचा आला जमाना


वेब टीम : दिल्ली
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या टिक टॉकने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

यंदाच्या फेब्रुवारीत टिक टॉक गूगल प्ले स्टोअरवर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर सर्वाधिक वेळा डाऊनलोड केले गेले आहे.

सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार उत्पन्न आणि वापर दोन्हींमध्ये या महिन्यात टिक टॉकने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह इतर समाज माध्यम अ‍ॅप्सना मागे टाकले आहे.

सेन्सरच्या अहवालानुसार फेब्रुवारीत टिक टॉक अ‍ॅप भारतात सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले. भारतातील अ‍ॅप डाऊनलोडची संख्या 4 कोटी 66 लाख इतकी आहे.

 ब्राझीलमध्ये हीच संख्या 97 लाख आणि अफैमिक मेरिकेत 64 लाख आहे. टिक टॉकला गूगल प्ले स्टोअरवर फेब्रुवारी 2020 मध्ये जवळपास 9 कोटी 32 लाख वेळा इन्स्टॉल करण्यात आले.

 याआधी हे अ‍ॅप केवळ 1 कोटी 97 वेळा डाऊनलोड झाले होते. टिक टॉक आल्यानंतर प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर एकूण 1.9 अब्ज वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post