हिंदुत्व आमच्या नसानसात... भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असे नाही : उद्धव ठाकरे


वेब टीम : अयोध्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राम मंदिर उभारणी संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली.

अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी शिवसेनेकडून एक कोटींचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. याचवेळी पत्रकारांच्या एका प्रश्नांला उत्तर देताना, ‘भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

आम्ही भाजपपासून बाजुला झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही’ असे म्हणत भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांंना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. ‘भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व वेगळं आहे आणि भाजप वेगळं आहे’, असे उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितले.

राममंदिर निर्माणासाठी एक ट्रस्टही तयार झाले आणि बँकेत खाते ही उघडले आहे. मला आठवतंय की बाळासाहेबांच्या वेळेपासून महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी शिळा पाठवल्या जात आहेत.

मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, महाराष्ट्रातून जे रामभक्त इथं येतील त्यांच्या सोईसाठी जमीन द्यावी.आम्ही त्यावर महाराष्ट्र भवन बनवू, असे ही त्यांनी म्हटले.

अयोध्येत येणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी पहिल्यांदा नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येला आलो होतो… आणि पुढच्या वेळेस नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री बनलो. मी मुख्यमंत्री होईन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, पण ती गोष्ट घडली. त्यामुळे मी तिसऱ्यांदा येथे आलोय, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

अयोध्येत या दौऱ्याच्या वेळी शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती पण कोरोनामुळे ते शक्य नाही. त्यामुळे मी पुन्हा अयोध्येत येईन आणि आरतीही करेन असा शब्दही उद्धव ठाकरेंनी दिला.उल्लेखनीय म्हणजे, कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर शरयू नदीची आरती करण्याचा आजचा मुख्यमंत्री ठाकरेंचा कार्यक्रम रद्द झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post