देशातील सर्व अधिकार आणि शक्ती आता केवळ पंतप्रधान कार्यालयातच एकवटली : सोनिया गांधी


वेब टीम : दिल्ली
केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

देशातील स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष केले जात असल्याचेही सोनिया यांनी म्हटले आहे.

देशात संघ राज्य प्रणाली अस्तित्वात आहे. ही व्यवस्था आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे.

मात्र, याचा विसर सध्याच्या सरकारला पडला आहे. कोणालाही विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जात आहे.

देशातील सर्व अधिकार आणि शक्ती आता केवळ पंतप्रधान कार्यालयातच एकवटली आहे, अशी टीकाही सोनिया यांनी केली.

पंतप्रधानांनी २० लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी त्याचे विश्लेषण केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post