मुख्यमंत्र्यांनी सांगावं, आम्ही मदत करायला तयार : फडणवीस


वेब टीम : मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन निवदेन सादर केले.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या अनेकांना उपचार मिळत नाहीत.

एकीकडे ही अवस्था आहे तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाहीत अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यावर संकट आलं आहे. बारा बलुतेदारांवरही संकट कोसळलं आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलेले नाही, ते द्यायला हवं

केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं?

सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही,

त्यांनाही देण्याच्या सूचना दिल्या आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच धान्य मिळत नाही.

रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही. त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही. आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात. 

राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू.

मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post