विशाखापट्टणममध्ये कंपनीत वायुगळती : पाच गावे केली रिकामी


वेब टीम : विशाखापट्टणम
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर कंपनीतून आज सकाळी वायू गळती झाली.

यामुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला.

गळती नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

स्थानिक प्रशासनाने आजूबाजूची पाच गावं रिकामी केली आहेत.

एलजी पॉलिमर कंपनीच्या तीन किमी परिसरात वायू गळतीचा परिणाम दिसत आहे.

डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास अडचण असा त्रास नागरिकांना होत आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत.

नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

तसेच लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सरकारी रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

यामध्ये बहुतांश लहान मुलं आणि वयोवृद्धांचा समावेश आहे.

एलजी पॉलिमर्स इंडस्ट्रीची स्थापना १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलिमर्स नावाने झाली होती.

ही कंपनी पॉलिस्टायरेने आणि को-पॉलिमर्सची निर्मिती करते.

१९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉवल अँड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पॉलिमर्सचे विलिणीकरण झाले आणि मग ही एलजी पॉलिमर्स इंडस्ट्री बनली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post