भाजपला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणातच अधिक रस...


वेब टीम : पुणे
खासदार गिरीश बापट आणि भाजप अध्यक्ष यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

त्यांच्या पक्षातील इतर वरिष्ठ पदाधिकारी देखील बेजबाबदार विधाने करत आहेत.

त्यामुळे या आपत्तीतही भाजपला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे,

परंतु, ही वेळ राजकारणाची नाही. लोकप्रतिनाधी म्हणून जनतेचे रक्षण करणे महत्वाचे आहे, असे भाजपला प्रतिउत्तर खासदार वंदना चव्हाण यांनी दिले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वत:च महापालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत होते

तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि महापालिकेतील गटनेते यांना न जुमानता श्रेय केवळ स्वत:ला लाटण्यासाठीच अधिक धडपड करत होते.

मग अचानक असे नेमके काय झाले की, त्यांना आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागत आहे, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

स्वत:च्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून आपली असमर्थता झाकली जाईल, असे वाटत असले तर जनता सूज्ञ आहे याची आठवण यांना असावी, असेही त्या म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post