सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील विरोधीपक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे होणार सहभागी


वेब टीम : दिल्ली
भाजपाने कामगार कायद्या बदल करण्यावरून बैठक बोलावण्यात आली आहे.

कामगारांचे दिवसाचे आणि आठवड्याचे कामाचे तास वाढविले जाणार, कामगारांना आपल्या अधिकारासाठी कोर्टात जाता येणार नाही.

असे काही बदल कामगार कायद्यात करण्यात आले असल्याने सोनिया गांधी यांनीही बैठक बोलावली आहे.

कामगार कायदा सुधारणा, स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाले या तीन मुद्दयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

या बैठकीसाठी १७ पक्षांनी सहमती दर्शविली असून पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची ऑनलाईन बैठक बोलावली आहे.

22 मे रोजी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

या बैठकीत १७ पक्ष सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, उपमु्ख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

तर, सपा आणि बसपाचे नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post