UPSC परीक्षेबाबत मोठा निर्णय; नागरी सेवा पूर्व परीक्षा ढकलली पुढे...


वेब टीम : दिल्ली
लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवल्याने नागरी सेवा पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलली आहे.

ही परीक्षा ३१ मे रोजी पार पडणार होती.लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४ मे रोजी बैठक बोलावली होती.

यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.

नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

२० मे रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर केली संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असे समजते.

उमेदवारांना नवीन तारीख ठरवल्यानंतर कळवणार आहे.

लॉकडाउनमुळे बऱ्याच परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांकडून एनओसी मिळालेली नाही.

प्रत्येक राज्यात परीक्षेसाठी केंद्र ठरलेली असतात.

जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन परीक्षेच्या तयारी संबंधीचा अहवाल युपीएससला देते.

पण लॉकडानमुळे राज्यांची तयारी झालेली नाही.

भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे २ हजार ५५३ नवे रुग्ण आढळले असून, ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४२ हजार ५५३ वर पोहचली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post