अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासात अडीच हजार बळी


वेब टीम : वॉशिंग्टन
अमेरिकेमध्ये कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच आहे. जगात सर्वाधिक बळी अमेरिकेत गेले आहेत.

बळींनी आता 75 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागच्या 24 तासांत 2448 जणांचा मृत्यू झाला.

त्यामुळे बळींची संख्या आता 76,942 वर पोहोचली आहे. तर, 12,92,879 जण संक्रमित आहेत.

दरम्यान, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 39,34,711 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 2,71,095 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 13,50,941 जण बरे झाले आहेत.

सध्या 23,12,675 जणांवर उपचार सुरू आहेत.

स्पेनमध्ये 2,56,855, इटली 2,15,858, इंग्लंड 2,06,715, रशिया 1,87,859, फ्रांस 1,74,791, जर्मनी 1,69,430, ब्राझील 1,35,773, तुर्कस्तान 1,33,721 तर इटलीत 1,04,691 रुग्ण आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post