चीनला जगाचा झटका; कोरोनाचे उगमस्थान शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत ठराव


वेब टीम : दिल्ली
कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठे झाली आणि त्याचा प्रादुर्भाव मानवामध्ये कसा झाला, याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निःपक्षपाती चौकशी करावी, या मागणीचा ठराव (डब्ल्यूएचओ) मधील सदस्य सभासदांनी मंजूर केला आहे.

हा ठराव जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सभेत मांडला जाणार आहे.

या ठरावाच्या बाजूने भारतासह ६२ देशांनी पाठिंबा दिला आहे.

युरोपीय संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली हा ठराव मांडला जाणार आहे.

या ठरावाला बांगलादेश, कॅनडा, रशिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, इंग्लंड, जपान, ब्रिटन, न्यूझीलंड, उत्तर कोरिया, ब्राझीलसमवेत ६२ देशांनी पाठिंबा दिला आहे.

यामध्ये थेट चीन अथवा वुहान शहराचा उल्लेख नसला, तरी कोरोनाच पहिला रुग्ण चीनमध्येच समोर आला होता;

मात्र चीनने ही माहिती अनेक दिवस लपवून ठेवली होती. अमेरिकेने कोरोनाला नेहमीच ‘चिनी व्हायरस’ असे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post