अहमदनगर : शहरातील मुख्य बाजारपेठ सुरु करण्यासाठी आयुक्तांनी जाहीर केले वेळापत्रक


वेब टीम : अहमदनगर
शहरातील मुख्य बाजार पेठेतील व्यापारी प्रतिनिधींनी बाजार पेठ सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आ. संग्राम जगताप यांची भेट घेवून चर्चा केली.

त्यानंतर आ. जगताप यांच्या समवेत आदेश चंगेडीया, संजय चोपडा, अनिल पोखरणा यांच्या विशेष प्रयत्नतून व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची मंगळवारी (दि.२६) दुपारी भेट घेतली.

या वेळी झालेल्या चर्चेत विविध पर्याय सुचविण्यात आले. त्यानुसार टप्प्या टप्प्याने बाजार पेठ सुरु करण्यावर एकमत झाले.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आयुक्त मायकलवार यांनी दुपारी उशिरा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून व्यापाऱ्यांच्या मागण्यांनुसार चर्चा केली.

त्यानुसार बुधवार २७ मे पासून मुख्य बाजारपेठेतील काही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी सर्व व्यापाऱ्यांना शासनाचे सर्व नियम पाळावे, असे आवाहन यावेळी केले.

या वेळी कमलेश भिंगारवाला, राम मेंघानी, मयूर जामगावकर, राहुल मुथ्था, श्यामराव देडगावकर, किरण व्होरा, विजय गुगळे, प्रतीक  बोगावत, योगेश नवलानी, रसिक बोरा, सुभाष बायड, नरेंद्र गोयल, ईश्वर बोरा, प्रदीप गांधी, नवीपेठ,अर्बन बँक रोड, शहाजी रोड, ठोक कापड व्यापारी असोसिएशन एम. जी. रोड व्यापारी असोसिएशन, होलसेल रिटेल फुटवेअर असोसिएशन, जुना कापड बाजार असोसिएशन, सराफ सुवर्णकार संघटना, माणिक चौक व्यापारी संघ आदी व्यापारी उपस्तीत होते.

अहमदनगर जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बुधवार (दि.२७) पासून नगर शहरातील बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील खालील नमुद भागातील व्यावसायिक आस्थापना सुरु करण्यास परवानगी देत आहे. तथापी सदर व्यावसायिक आस्थापना या महानगरपालिका हददीमध्ये घोषित केलेल्या कंटेनमेंट एरिया व बफर एरिया वगळून लागु असतील. व्यावसायीक आस्थापनांचे ठिकाणे सुरु करावयाचा दिनांक खालील प्रमाणे –
दिनांक २७-०५-२०२०
१) कापडबाजार(एम.जी रोड)भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक
२) नवीपेठ-श्रीराम कॉम्लेक्स ते नेता सुभाष चौक
३) शहाजी रोड(घासगल्ली),कापड बाजार ते नवीपेठ

दिनांक २८-०५-२०२०
१) चितळे रोड – तेलीखुट चौक ते चौपाटी कारंजा
२) लक्ष्मीबाई कारंजा- बॅक रोड-जुनाकापडबाजार
३) माणीक चौक-भिंगारवाला चौक

दिनांक २९-०५-२०२०
१) सारडा गल्ली व परिसर
२) मोची गल्ली व परिसर
३) गंजबाजार व परिसर

बाजार पेठ सुरु करण्यासाठी अटी व शर्थी बंधनकारक 
१. अहमदनगर महानगर पालिका क्षेत्रातील या पुवी घोषित केलेल्या कंटेनमेंट एरियासाठीचे सर्व निबंध लागु राहतील.
२. अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील या पूर्वी घोषित केलेल्या बफर झोन एरियासाठी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
३. सदर व्यावसायीक आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ ही सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.पर्यंत राहिल
४. सदर व्यावसायीक आस्थापना मध्ये SOCIAL DISTANCING पाळणे, तेथील सर्व मालक कर्मचारी व ग्राहक यांनी मास्क वापरणे,हात सातत्याने सैनिटायझर करणे बंधनकारक राहिल.
५. जिल्हा दंडाधिकारी, अहमदनगर यांनी लागु केलेल सर्व आदेश व इतर सर्व निर्बध लागु राहतील.
६. सदर बाजारपेठेतील रस्त्यावर हातगाडीवाले व फेरीवाले यांना पुर्णपणे बंदी राहिल.

वरिल अटी, शर्ती, नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल अन्यथा सबंधीतांविरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई करुन व्यावसायिक आस्थापना तात्काळ सील करण्याची कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post