नाथाभाऊ माझे जुने मित्र, काँग्रेसमध्ये आले तर स्वागत; बाळासाहेब थोरात


वेब टीम : मुंबई
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांना खुलं निमंत्रणच दिल आहे.

एकनाथ खडसे काँग्रेसचा विचार घ्यायला तयार असतील तर त्यांचं निश्चित स्वागत करु असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोरात म्हणाले की, एकनाथ खडसे हे एक कर्तृत्वान नेते आहेत.

त्यांना मी १९९० सालापासून ओळखतो.

नाथाभाऊ म्हणाले की मी त्यांच्याशी संपर्क साधला होता.

ते माझे जुने मित्र आहेत.

आम्ही १९९० पासून विधानसभेत एकत्र आहोत.

खडसे हे जनमानसात वावरलेले नेते आहेत.

जर काँग्रेसच्या विचारांचा स्वीकार करून, ते आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार या आशेवर असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अपेक्षाभंग झाला.

पक्षाने वरिष्ठ नेत्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे खडसे जाम संतापलेले आहेत.

आता त्यांनी परत पक्ष नेतृत्वावर आगपाखड करायला सुरुवात केली असून, मला काँग्रेस पक्षापासून ऑफर आल्याची माहिती दिली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post