बाळासाहेब थोरातांनी सांगितले उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेचे रहस्य...


वेब टीम : मुंबई
प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती यूथ फेस्टिवलमध्ये महाराष्ट्र दिनी महसूलमंत्री थोरात यांनी शुक्रवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंंगद्वारे साधला संवाद साधला.

यावेळी कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन असताना जनतेने केलेले सहकार्य मोलाचे असून प्रशासन सरकार व कोरोना वॉरियर्स यांचे काम कौतुकास्पद राहिले आहे, असे थोरात म्हणाले़.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे.

त्यांच्या वागण्यातील सहजता, सर्वांना समावून घेण्याची कार्यपध्दती तसेच कोणतेही राजकीय डावपेच न वापरता त्यांनी घेतलेले विकासाचे निर्णय यामुळे ते लोकप्रिय आणि यशस्वी ठरत आहेत.

तरूणांनी राजकारणात काम करताना जिद्द, प्रामाणिकपणा ठेवावा.

असलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास यश नक्की मिळेल, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post