मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...


वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.

आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रविण प्रभाकरराव दटके, गोपिचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषिमंत्री दादाजी भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह सदस्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post