जंतुनाशकाची फवारणी केली तरीही मरत नाही कोरोना व्हायरस...


वेब टीम : जेनेवा
सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारल्यामुळे कोरोनाव्हायरस मरत नाहीत, उलट असे केल्याने लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

रस्त्यावर आणि बाजारामध्ये जंतुनाशक फवारल्याने फायदा होत नाही कारण ते धूळ आणि घाणीमुळे निष्क्रिय होतात.


कोणत्याही परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर जंतुनाशक फवारणी करता कामा नये.

यामुळे शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते.

असे केल्याने संक्रमित व्यक्तीद्वारे व्हायरस पसरविण्याचा धोका देखील कमी होत नाही.

क्लोरीन आणि इतर विषारी रसायनांमुळे डोळे आणि त्वचेशी संबंधित त्रास उद्भवू शकतो.

श्वास घेण्यात अडचण आणि पोट-आतड्यांसंबंधी रोग देखील होऊ शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

घरात किंवा ऑफिसमध्ये देखील थेट जंतुनाशक फवारणी करु नये,

त्याऐवजी ते कपड्याने स्वच्छ केले पाहिजे.

कोरोना व्हायरस विविध वस्तू आणि कामकाजाच्या ठिकाणांच्या पृष्ठभागावर असू शकतो.

तो कोणत्या पृष्ठभागावर किती वेळ टिकतो याची कोणताही अचूक माहिती नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post