चीनच्या प्रयोगशाळेतूनच पसरला कोरोनाचा विषाणू ; अमेरिकेचा पुनरुच्चार


वेब टीम : वॉशिंग्टन
संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाच्या खाईत लोटणारा विषाणू चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्रीय सचिव माइक पॉम्पिओ यांनी केला.

ट्रम्प प्रशासनाकडे या बाबत खात्रीलायकरित्या माहिती असल्याचे ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

‘मी मिळालेली संपूर्ण माहिती यावेळी जाहीर करू शकत नाही.

पण कोविड-१९ च्या प्रसाराबाबतची महत्वाची माहिती आमच्याकडे आहे आणि कोविडचा प्रसार होण्यास वुहानची प्रयोगशाळा कारणीभूत आहे यावर आम्ही ठाम झालो आहोत’, असे पॉम्पिओ म्हणाले.

वुहानच्या प्रयोगशातूनच काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याचीही माहिती त्यांनी दिली.


‘या प्रकरणाच्या आता तळाशी जाण्याची गरज आहे.

त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून आम्ही पाश्चिमात्य देशांना या प्रयोगशाळे संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात यावी याची मागणी करत आहोत’, असे ही ते म्हणाले.

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत तब्बल ७० हजार जणांचा बळी गेला आहे.

तर १२ लाखांहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.

‘अमेरिकेत जे घडलंय ते घडायला नको होतं. पण हा विषाणू चीनच्या वुहानमधून आलाय हे सर्वांनाच माहिती आहे.

चीनला या विषाणूची डिसेंबर महिन्यातच संपूर्ण माहिती होती, पण त्यांनी दिरंगाई केली.

जागतिक आरोग्य संघटनादेखील चीनच्या आदेशानुसारच काम करत आली आणि या विषाणूला जागतिक साथ जाहीर करण्यात त्यांनी खूप उशीर केला’, असा आरोपही पॉम्पिओ यांनी केला.

‘चीनच्या लपवाछवपीमुळे आज सारे जग मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

आताही मी येथे तुमच्यासमोर बसून मुलाखत देत असलो तरी या क्षणी देखील आपल्याकडे अपेक्षित माहिती दिलेलीच नाही.

तरी सुद्धा आजही आम्ही चीन सरकारकडे वुहानच्या प्रयोगशाळे संदर्भातील आम्हाला अपेक्षित असलेली माहिती देण्याची मागणी करत आहोत’, असे ही पॉम्पिओ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post