नागपूर : पाच हजार बेडच्या कोव्हीड केअर सेंटरची उभारणी

representative image

वेब टीम : नागपूर
नागपूर महापालिकेने राधास्वामी सत्संग न्यास संस्थेच्या सहकार्याने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील आश्रमाच्या परिसरात सुमारे पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारले आहे.

अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे देशातील पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.

या सेंटरला आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली.

विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यावेळी उपस्थित होते.

कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत.

नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे,

यासाठी नागपूर महापालिकेने सूक्ष्मनियोजन करून हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारले असल्याची माहिती आयुक्त मुंडे यांनी दिली.

सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे 42 विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे.

क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे.

भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपाने ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली.

या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली.

केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post