सीआरपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता विकल्या जाणार फक्त भारतीय वस्तू


वेब टीम : दिल्ली
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटर वरून दिली.

सर्व सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त देशात बनलेल्या उत्पादनांचीच विक्री करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने आज घेतला आहे.

१ जून पासून देशभरातील सर्व सीएपीएफ कॅन्टीनमध्ये हा निर्णय लागू होईल.

या निर्णयामुळे जवळपास १० लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे ५० लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करतील असे ना.अमित शाह यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post