चीनच्या विरोधात अमेरिका आक्रमक; 'या' मोठ्या कंपनीवर लादले निर्बंध


वेब टीम : बोस्टन
अमेरिका आणी चीन यांच्यातील व्यापार संबंध आता चिघळण्याच्या दिशेने वाटचाल करु लागले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनसोबत व्यापार चर्चा करणार नसल्याचे जाहीर केल्यापाठोपाठ अमेरिकेने चीनच्या बलाढ्य सरकारी कंपनी हुवावेईवर नवे निर्बंध घातले आहेत.

हुवावेईच्या अमेरिकी तंत्रज्ञान वापरण्याला लगाम लावण्यात आला आहे.

यामुळे उद्योग विकास आणि सुरक्षितेच्या मुद्यांवरुन अमेरिका आणि चीन यांच्यात जुंपण्याची शक्यता वाढली आहे.

अमेरिकेचे व्यापार मंत्री व्हिल्बर रॉस यांनी शुकव्रारी सागिंतले की टेलिकॉम क्षेत्रातील चीनी कंपनी हुवावेईवर विदेशात सेमीकंडक्टरच्या डिझाईन आणि उत्पादनासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाचा वापर केल्याप्रकरणी आधीच निर्बंध घालण्यात आले आहेत.

चीनने अमेरिकी तंत्रज्ञानातील त्रुटीचा लाभ घेऊन ते वापरण्याची संधी साधून घेतली आहे.

हुवावेई हा चीनचा पहिला जागतिक ब्रँड असून अमेरिकी तंत्रज्ञानाची नक्कल केल्यामुळे ते साध्य झाले असा अमेरिकेचा आरोप आहे.

तसेच हुवावेई कंपनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोठा धोका आहे असे अमेरिकेचे मत आहे.

नव्या निर्बंधानुसार विदेशी सेमीकंडक्टर निर्मात्यांना हुवावेईद्वारा अमेरिकी तंत्रज्ञानाच्या आधारे डिझाईन करण्यात आलेल्या सेमीकंडक्टरची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेकडून पनवानगी घ्यावी लागणार आहे.

ज्या चीनी कंपन्या ही परवानगी घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे.

जगात सेमीकंडक्टर कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चीपचे डिझाईन आणि निर्मिती करण्यात अमेरिकेचे वर्चस्व आहे.

चीनने मात्र हुवावेई कंपनी अमेरिकी कंपन्यांना स्पर्ध देत असल्यामुळे अमेरिका आगपाखड करीत असल्याची टिप्पणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post