राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न...


वेब टीम : मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठं पॅकेज जाहीर करेल.

जेव्हा हे पॅकेज जाहीर होईल तेव्हा भाजप नेत्यांचे डोळे नक्कीच पांढरे होतील.

केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे.

पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही.

मात्र आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

तसेच भाजप केवळ राज्य सरकार अडचणीत कसे येईल याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

राज्यात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

 त्यामुळे केंद्रा प्रमाणे राज्य सरकारने देखील 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भाजपने केली आहे.

यासाठी भाजपने काल माझं अंगण, माझं रणांगण असा नारा देत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन देखील केले.

यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post