हॉंगकॉंगमधील आंदोलन चिरडण्याचा चीनचा डाव... १० हजार सैनिकांचा फौजफाटा सज्ज


वेब टीम : बीजींग
हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांचे विराट आंदोलन सुरू असतानाच येथील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चीनचे तब्बल १० हजार सैनिक हाँगकाँगमध्ये घुसण्यासाठी सज्ज आहेत.

हाँगकाँगच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याची धमक चीनमध्ये आहे; परंतु आमच्या ताकदीला कमी लेखू नका, असा दम चीनने भरला आहे.

याचवेळी चिनी शासनकर्त्यांनी आदेश देताच लोकशाही समर्थक आंदोलकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लष्करातील एका वरिष्ठ कमांडरने दिला आहे.

चीन पुरस्कृत 'राष्ट्रीय सुरक्षा कायद्या'ची अंमलबजावणी करण्याचा राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा जोरदार प्रयत्न आहे;

परंतु त्यास स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे.

त्यातच हाँगकाँगच्या संसदेत वादग्रस्त विधेयकावर चर्चा सुरू असताना चीनच्या राष्ट्रगीताची खिल्ली उडवण्यात आली आहे.

त्यामुळे चीनच्या रागाचा तिळपापड झाला आहे. लोकशाही समर्थकांच्या आक्रमक आंदोलनामुळे चीनचे लष्कर प्रचंड संतापले आहे.

म्हणूनच हाँगकाँगमधील सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी १० हजार सैनिकांचा फौजफाटा सज्ज असल्याचा इशारा लष्करी कमांडर छेन दाओशियांग यांनी एका मुलाखतीत दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post