बाप रे... भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७० हजारांच्या जवळ


वेब टीम : दिल्ली
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.

देशभरात चोवीस तासांत ४ हजार २१३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६७ हजार १५२ वर पोहचली आहे.

ही माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सोमवारी दिली.

देशभरातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आता ६७ हजार १५२ वर पोहचली आहे.

ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ४४ हजार ०२९ रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी सुखरूप गेलेले २० हजार ९१६ जण व एकजण स्थलांतरित आहे.

आतापर्यंत मृत्यू झालेल्या दोन हजार १०९ जणांचा समावेश आहे.

रविवारपर्यंत देशभरात कोरोनामुळे २ हजार २०६ जणांचा बळी गेलेला आहे.

एकीकडे जग कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे.

तर दुसरीकडे कोरोनावरील औषधासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post