लाऊडस्पीकरवर अजान लावल्यामुळे त्याचा इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो ; जावेद अख्तर


वेब टीम : मुंबई
जावेद अख्तर यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे.

“भारतात ५० वर्षांपर्यंत लाऊडस्पीकरवर अजान लावणं हराम होतं.

मात्र कालांतराने ते हलाल झालं.

इतकंच नाही तर अशा प्रकारे हलाल झालं की त्याची कोणतीही सीमा राहिली नाही.

अजान करणं चांगली गोष्ट आहे.

मात्र लाऊडस्पीकरवर अजान लावल्यामुळे त्याचा इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो.

त्यामुळे मला आशा आहे की, या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल.”

लाऊडस्पीकरवरच्या अजानमुळे इतरांना त्रास होतो, या जावेद अख्तर यांच्या ट्विटवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्याबाबत असहमती व्यक्त केली आहे.

काही नेटीजन्सने जावेद यांना, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत, असे म्हणून पाठिंबा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post