२२ मे रोजी 'मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन : चंद्रकांतदादा पाटील


वेब टीम : मुंबई
कोरोनाच्या संकटात भाजपने राज्य सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली.

या राज्य सरकारने चांगली कामगिरी केली नाही.

या सर्व गोष्टाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 22 मे 2020 रोजी भाजपतर्फे "मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येणार असून सोशल डिस्टनिंग पाळून राज्यभर ठाकरे सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

काळे मास्क, काळी टोपी, काळे शर्ट आणि काळ्या ओडण्या घालाव्यात असे आवाहनही चंद्रकांतदादांनी केले आहे.

हातावर पोट असणाऱ्या गरीब माणसांसाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.

सर्व जिल्ह्यात जिल्ह्याधिकाऱ्यांनाही अशाचप्रकारचे निवेदन देऊन सरकारच्या कारभाराकडे लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post