नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोनाचा प्रसार... भाजप म्हणते...


वेब टीम : अहमदाबाद
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना बोलावून लाखो नागरिकांच्या उपस्थितीत भाजपने घेतलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोनाने ८०० पेक्षा जास्त बळी घेतल्याचा आरोप गुजरात कॉँग्रेसने केल्याने खळबळ उडाली आहे.

तर या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडून कॉँग्रेस राजकारण करीत असल्याचे प्रत्युत्तर भाजपच्यावतीने देण्यात आले आहे.


२४ फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत रोड शो केला होता.

त्यानंतर दोन्ही नेत्यांनी मोतेरा क्रिकेट स्टेडियममध्ये सुमारे एक लाखाहून अधिक लोकांच्या जमावाला संबोधितही केले होते.

या कार्यक्रमाचे नाव 'नमस्ते ट्रम्प' असे ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा संबंध आता राज्यातील कोरोना प्रसाराशी जोहला जावू लागला आहे.

गुजरातमध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना २० मार्च रोजी नोंदली गेली. त्याचबरोबर २५ मे पर्यंत राज्यात संक्रमणामुळे ८८८ लोकांचा मृत्यू झाला आहे,

तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १४,४६८ इतकी झाली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता कोरोनावरून राजकारण तापू लागले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जानेवारीत कोरोना विषाणूचा इशारा दिला होता.

राज्य सरकारने भाजपने नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केल्यामुळे येथे ८०० हून अधिक लोक बळी गेले.

राज्याच्या आरोग्य विभागानेही २२ जानेवारी रोजी या आजाराबद्दल अधिसूचना काढत जिल्हा कार्यालयांना खबरदारीचा उपाय करण्याचे आदेश दिले होते.

अशा परिस्थतीत हा कार्यक्रम तर झालाच, परंतु सरकारने पीपीई किट आणि व्हेंटिलेटर खरेदी करण्यासह इतर खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या नाहीत.

त्यामुळे भाजपच्या या कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी दिली.

गुजरात भाजपचे प्रवक्ते भारत पंड्या यांनी मात्र हे सर्व आरोप निराधार असून कॉँग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले की, नमस्ते ट्रम्प आणि कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये कोणताही संबंध नाही हे गुजरातच्या लोकांना माहित आहे.

दिल्लीत तबलीगी जमात कार्यक्रमानंतर गुजरातमध्ये परतलेल्यांमुळेच राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झाला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post