'हिजडा' शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल; निलेश राणेंना इशारा


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर हल्लाबोल करत आहे.

याचदरम्यान निलेश राणे यांनी ट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केला.

यावरुन तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना खडेबोल सुनावले आहे .

‘हिजडा’ या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका.

जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला.

हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.

निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधकांवर कडाडून टीका करत आहे.

यातूनच निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली.

इतकेच नाही तर त्यांना हिजडा असे संबोधले . यावरून सारंग पुणेकर यांनी आपला संताप व्यक्त केला .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post