देशातील लोकल ब्रॅण्ड्सला आता ग्लोबल बनविणार : अर्थमंत्री


वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज घोषित केले.

जे भारताच्या जीडीपीच्या १० टक्के एवढे आहे.

यामुळे भारताच्या रुतलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

भारताने आत्मनिर्भर बनावे असा या पॅकेजमागचा मूळ हेतू आहे.

भारतीय नागरिकांनी भारतात तयार होणा-या वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन मोदींनी केले होते.

त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना संबोधित करताना अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

तसेच, लोकल ब्रॅण्ड्सना ग्लोबल बनवण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

तसेच, यापूर्वीच्या आर्थिक पॅकेजमधून तीन महिन्यांत गरिबांना, शेतकऱ्यांना मदत केली.

अनेक लोकांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होत आहे, असेही सीतारामन यांनी नमूद केले.

२० लाख कोटींच्या पॅकेजच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आहे.

यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर, विविध मंत्रालयांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचेही सीतारामन म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post