भाजपचं राज्यभर आंदोलन; पंकजा मुंडेंच्या परळीत मात्र निषेधही नाही


वेब टीम : बीड
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यामध्ये राज्य शासनाला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपाने राज्यभरात काळ्या फिती लावून आंदोलन केले

या आंदोलनात बीड भाजपाने सहभाग नोंदवला.

आष्टी, गेवराई, बीड, अंबाजोगाई, केज तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले

मात्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीत आंदोलन झालं नाही.

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यामध्ये राज्यातल्या ठाकरे सरकारला अपयश आल्याचा ठपका भाजपाने ठेवून ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन आंगण हेच रणांगण’ हे आंदोलन राज्यभरात केलं.

बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोर दहा-पाच कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावत आणि हातात बोर्ड घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली

आष्टीमध्ये आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

आ. धसांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

माजी आ. भीमराव धोंडेंनी आपल्या निवासस्थाना समोर काळ्या फिती लावून आंदोलन केले.

गेवराईमध्येही आ. लक्ष्मण पवार यांनी घोषणाबाजी करत काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवला.

केजमध्ये भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

अंबाजोगाईत भाजपाकडून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंहे यांच्या परळीत मात्र भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं नसल्याने पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post