कोरोनाप्रमाणेच असलेल्या इबोला व्हायरसचा लावला होता शोध;आता कोरोनाची झाली लागण


वेब टीम : लंडन
इबोलाचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेले पीटर पिऑट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

७१ वर्षांचे पिऑट सुरुवातीला घरातच उपचार घेत होते.

१ एप्रिलला ताप आणखी वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आठवडाभरानंतर त्यांना सुटी देण्यात आली. १९ एप्रिलला त्यांना कोरोनाने ग्रासले.

त्यांच्या छातीच्या एक्स-रे मध्ये न्यूमोनियाने फुफ्फुस व्यापल्याचे दिसले.

कोरोनाचाच हा एक प्रकार असल्याचे दिसून आले.

शरीरातून विषाणू नाहीसा झाल्यानंतरही त्यांना बराच काळ अशक्तपणा आणि श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता.

१९७६ मध्ये इबोलाचा शोध लावणाऱ्यांत त्यांचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्राच्या एचआयव्ही आणि एडस् कार्यक्रमाचे ते १९९५ ते २००८ काळात प्रमुख म्हणून वावरले.

युरोपियन आयोगाचे अध्यक्ष उरसुला वोन डेर लायन यांचे ते कोरोनाविषयक सल्लागार म्हणून काम पाहात होते.

कोरोनाची बाधा झाल्यानंतरही त्यांनी एकही दिवस सुटी न घेता घरातूनच काम केले.

या संपूर्ण काळात कोरोना खूप काही शिकवून गेल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post