लहान मुलांकडं दुर्लक्ष करायचा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय; राज्यमंत्री तनपुरेंचा निलेश राणेंना टोला


वेब टीम : अहमदनगर
एखाद्याला अपशब्द वापरले, की आपण काहीतरी पराक्रम केला, असा काहींचा समज असतो.

खासकरून लहान मुलांना तसं वाटत असतं. अशा लहान मुलांकडं कधी-कधी दुर्लक्ष करायचं असतं.

माझ्या कार्यकर्त्यांनाही मी तसा सल्ला दिला आहे, अशा शब्दात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार नीलेश राणेंना टोला लगावला.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाची मतं असतात. लोकशाहीच्या दृष्टीनं ते चांगलंच आहे. एकमेकांना उत्तर द्यायलाही काही हकरत नसते.

पण, त्याची एक पद्धत असते. एक संसदीय भाषा असते. ती भाषा राणेंच्या उत्तरात दिसली नाही.

मी त्यांना चांगल्याच भाषेत सल्ला दिला होता, पण त्यांची भाषा अधिकच घसरल्याने अशा लहान मुलांकडं मी दुर्लक्ष करतो.

तनपुरे यांनी केलेल्या या टीकेवर आता राणे काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचेे ठरणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

तनपुरे म्हणाले, की रोहित पवार आमदार आहेत.

नीलेश राणे यांच्याकडं आता कुठलं पद आहे, याची मला कल्पना नाही; पण ते माजी खासदार आहेत.

त्यांची भाषा चांगली असेल, असं मला वाटलं होतं. पण, एकूण त्यांचे शब्दप्रयोग बघता लहान मुलांकडं दुर्लक्ष करा, असा सल्ला मी कार्यकर्त्यांना दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post