केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहे : राहुल गांधींचा सवाल


वेब टीम : दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात केला.

देशातील लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

आम्ही २१ दिवसांत कोरोना विषाणूचा पराभव करू असे सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते,

मात्र ६० दिवसांचा काळ उलटला असूनही हा विषाणू जलदगतीने वाढतच आहे, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले आहे.

देशातील लॉकडाऊनचा उद्देशच निष्फळ झाल्याचे ते म्हणाले.

लॉकडाऊच्या ४ टप्प्यांमध्ये ज्या परिणामांची पंतप्रधान मोदी यांना अपेक्षा होती तसे झाले नाही.

आता लॉकडाऊन अपयशी ठरताना सरकार आता पुढे काय करणार आहे हे आम्ही सरकारला विचारू इच्छितो, असे राहुल यांनी म्हटले आहे.

विविध देशांमध्ये लॉकडाऊन उठवला जात असताना तेथील रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहेत.

भारतात मात्र लॉकडाऊन सुरू असतानाच रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

केंद्रसरकार गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, याचेही उत्तर राहुल गांधी यांनी मोदी यांच्याकडे मागितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post