सरकार - प्रशासनाचे खच्चीकरण होईल असे बोलण्याची ही वेळ नाही : राज ठाकरे

file photo

वेब टीम : मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक बोलावली होती.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह १८ पक्षांच्या नेत्यांना बोलावले होते.

मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लस आल्याशिवाय कोरोना जाणार नाही आणि कायमस्वरूपी लॉकडाऊन ठेवू शकत नाही.

त्यामुळे सरकारने लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन ठरवावा, असे राज ठाकरे म्हणाले.

त्याचप्रमाणे, आता बाहोरून येणा-या प्रत्येकावर प्रशासनाने कडक नजर ठेवायला हवी.

शहरांच्या एन्ट्री पॉइंटवर नियम कडक करायला हवेत. प्रत्येक वेळी माणुसकी उपयोगाची नाही, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

कोरोनामुळे देशावर, राज्यावर आज जी परिस्थिती आली आहे. ती आपल्या जन्मापासून किंवा आपल्याला समज आल्यापासून पहिल्यांदाच पाहतोय.

मुंबईचे शांत निर्मनुष्य रस्ते यापूर्वी मी केवळ ब्लॅक अँड व्हाईट मरीन ड्राईव्हच्या चित्रातच पाहिले होते. सध्याचा काळ आव्हानात्मक आहे.

त्यामुळे सरकार आणि प्रशासनाचे नैतिक खच्चीकरण होईल असं काहीही बोलण्याची ही वेळ नाही.

सरकार दरबारी काही त्रुटी असल्या तरी त्या सांगण्याची आता ही वेळ नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post