देश संकटात असताना भाजप मोदींच्या कामांचं कौतुक करतंय...


वेब टीम : मुंबई
भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. 

केंद्र सरकारनं कोर्टात भाडं राज्यानं दिल्याचं स्पष्ट केलं आहे. 

आता भाजप नेते ते अनुदान असल्याचं म्हणत आहेत. मात्र, यावरुन रेल्वेचं राजकारण केलं जात असल्याचं स्पष्ट होत आहे. 

केंद्राच्या अपयशामुळंच मजुरांची उपेक्षा झाली. याबाबत भाजप नेत्यांनी आता खोटं बोलणं सोडावं.

मोदी सरकारला सहा वर्षे झाले. आज देश कोरोनाच्या संकटात लोटला गेला त्याला फक्त मोदी सरकार कारणीभूत आहे. 

अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचा समाचार घेतला.

हेच मोदी सरकारचं मोठं अपयश आहे. मोदी त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात गुंग आहेत. 

पण देश संकटाच्या दरीत लोटला गेलाय. जीडीपी फक्त आताच कमी होईल असं नाही. 

याआधीही जीडीपीचे दर कायम खाली जात होते. 

कोरोनाचं संकट आता आलं, पण मोदी सरकारच्या काळात आधीपासून जीडीपीचा हा दर कमी होत गेला. 

जीडीपीनं गेल्या दशकातील निचांक गाठला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची धोरणं जबाबदार आहेत, असंही सचिन सावंत म्हणाले.

लॉकडाऊन हा कोरोना नियंत्रणावरील अंतिम उपाय नाही. 

लॉकडाऊनचा उपयोग हा कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा वाढवण्यासाठी करायला हवा होता. 

पण केंद्र सरकारने तसं केलं नाही. त्यामुळं अर्थचक्रही रुतून बसलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post