आताच वेळ आहे, काँग्रेस - राष्ट्रवादीसोबतची युती तोडा; 'या' नेत्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला


वेब टीम : दिल्ली
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

याच मुद्द्यावरून भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्याम स्वामी यांनी उद्धव ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

जगाच्या तुलनेत भारताने कोरोनावर मात करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे.

देशातील अनेक राज्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी पाऊल उचलत असताना महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा उद्रेक थांबत नाहीये.

एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 37 हजारांपर्यंत पोहचला आहे.

या स्थितीवरून स्वामी यांनी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे

तर दुसरीकडे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

आताच वेळ आहे, नंतर कधीच नाहीः उद्धव ठाकरे आता आघाडी सरकारसोबत युती तोडा

नाहीतर राष्ट्रवादी व कॉंग्रेस तुम्हाला उद्ध्वस्त करतील.” असे ट्विट सुब्रमण्याम स्वामी यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post