मध्यप्रदेशात पुन्हा होणार राजकीय भूकंप; ज्योतिरादित्य सिंधीयांनी ट्विटरवरून भाजपला हटवले...?


वेब टीम : भोपाल
मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आगामी पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेस सोडून आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या २२ समर्थक आमदारांना तिकिट देण्याचा दावा केला.

मात्र, आता या समर्थक आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनके जागांवर भाजपामधील जुने नेते बंडखोरी करत आहेत.

भाजपाला आपल्या नेत्यांना पटवून देणे अवघड जात असल्याचे बोलले जात आहे.

तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक माजी आमदारांच्या काही जागांवर विजय मिळविण्यावरही शंका उपस्थित होत आहे.

त्यातच भरीस भर म्हणजे भाजपा नेते आणि माजी केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरवरून भाजपा हटवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेस सोडण्यापुर्वीही सोशल मीडियावरून असेच काही संकेत दिले होते. ट्विटरवरून कॉंग्रेस काढले होते.

यावेळेस मात्र, ज्योतिरादित्य यांनी ट्विटर प्रोफाईलवर भजपा जोडलेच नव्हते असे काही लोकांचे म्हणणे आहे.

परंतू याबाबत अद्याप सिंधिया यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तर, दुसरीकडे आपल्या समर्थकांना घेऊन भाजपात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया आमि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यात आलबेल नसल्याचे दिसते.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मंत्रिमंडळावरून काही संभाव्य तारखा अनौपचारिकरित्या जाहीर केल्या आहेत.

राज्यातील पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्र्यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली, ती माध्यमांतून लीक झाली.

मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही.

याचबरोबर, केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात जोतिरादित्य सिंधिया यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चाही आता कमी झाली आहे.

त्यामुळे आगामी काळात सिंधिया काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post