मोदीजी, सत्य लपवू नका... आता पुरे झालं... नेमकं काय घडलं ते सांगा : राहुल गांधी


वेब टीम : दिल्ली
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामधील हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांनी प्राण गमावला आहे.

या घटनेने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय कोणत्याही नेत्यानी यासंद्रभात बोलणे टाळले आहे.

यावरून कॉंग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान मोदींना प्रश्न केले आहेत.

पंतप्रधान आता गप्प का आहेत, चीनची प्रदेश बळकावण्याची, आपले सैन्य मारण्याची हिंमतच कशी होते असे संतप्त प्रश्न गाहुल गांधींनी ट्विटरवरून पंतप्रधानांना केले आहे.

ते म्हणाले की, “पंतप्रधानांनी मौन का धारण केलं आहे? ते काय लपवत आहेत? आता पुरे झालं.

आम्हाला कळायला हवं की नेमकं काय घडलं? आपल्या सैनिकांना मारण्याची, आपला प्रदेश बळकावण्याची चीनची हिंमत कशी होते?”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post